विचारांची जयंती करू

         विचारांची जयंती करू 

हा लेख प्रत्येक भीमसैनिकांसाठी आहे जे या वर्षीची भीम जयंती साजरी करण्यासाठी आतुर आहे . हा लेख आपल्या भावना समजून त्या वर भाष्य करणारा आहे . हा लेखामधे समजण्यासारख व समजून घेण्यासारख भरपूर काही आहे . अशा करतो की हा ही लेख तुम्हाला नक्की आवडेन .

भीम जयंती येण्या आगोधरच त्या वर चर्चा चालू असते की , आता या वर्षीची भीम जयंती किती जलोषात साजरी कराची ते . भीम जयंती नुसती भारतात न करता अमेरिका , जपान , ऑस्ट्रेलिया , लंडन इत्यादी शहरात साजरी करतात . बाबासाहेबांची जयंती ही नुसती जयंती नसून भीमसैनिकांसाठी एक सण आहे . हाच सण या वर्षी अडचणीत आला आहे त्याच कारण तर सर्व जनतेस माहित तर असेनच . कोरोना ( COVID 19 ) हा विषाणू आपल्या भारतात आला आहे त्या वर उपाय आजून ही निघाला नसून प्रत्येक भारतीयांना आव्हान केल जात आहे की घरा बाहेर पडू नका , जर गरज असेल तर मास्क लावून बाहेर पडा व लोकांशी जास्त भेटू नका , बाहेरून आला की साबणाने किंवा सानिटाइजर ने हात धूवा . सरकार एकजूठीने काम करीत आहे आणि आपण एक भारताचा जवाबदार नागरिक म्हणून या कामात आपण आपले योगदान दिल पाहिजे आणि याचे परीणाम आपल्यासाठी जेवढे उपयुक्त ठरेल ना तेवढेच ते आपल्या देशासाठी ही ठरेल .

भारताच्या पंतप्रधानांनी २२ मार्च २०२० या दिवशी रात्री ८ वाजता हे सांगीतल होतेे की भारतात हा जीव घेना विषाणू ला संपवण्यासाठी आपल्याला २१ दिवसाचा लॉकडोव्न पाळावा लागेन . पंतप्रधानाच्या या निर्णयावर माझा काहीही आक्षेप नाही त्यांनी हा निर्णय प्रत्येक भारतीयांच्या भल्यासाठी घेतलेला आहे . तरी सुद्धा लोक या निर्णयाला पुरेपूर प्रतिसाद नाही देत , म्हणून भारतात कोरोना सारख्या विषाणूने पसरण्यात वेग घेतला आहे तर या विषाणू वर मात करण्यासाठी आपण सर्वे घरातच बसू व सरकारच्या नियमांचे पालन करू . या वर्षी भीम जयंती होणार नाही आसे नाही , भीम जयंती होणार प्रत्येकाच्या घरी होणार , पण शांततेत होणार नाही कोणत्या धूमधड्याकात . यावेळी पहिल्यांदा भीम जयंतीत सगळ सून असेन पण काही हरकत नाही , कारण देशाची सुरक्षितता पण महत्त्वाची आहे आणि असा कलम सुद्धा साहेबांचाच आहे बाबासाहेब आमच्या मना मना मध्ये आहे त्यांची जयंती जरी या वर्षी जोरदार किवा जल्लोशात होऊ शकली नाही तरी याच दुख मनात खन्त करत राहिलच पण काय हरकत नाही . आम्ही बाबासाहेबांची विचारची जयंती करू , या वेळी नाचून नाही तर बाबासाहेबांना वाचून मानवंदना देऊ . प्रत्येक भीमसैनिकांना माझ्याकडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही १४ एप्रिलला घरा बाहेर न पडता घरातच डॉ . बाबासाहेबांना मानवंदना द्या व आपली स्व्ताची काळजी घ्या .
बाबासाहेबांचे विचार आपण आहमलात आणू व बाबासाहेबांचे विचार जग भर पसरवू . बाबासाहेबांची जयंती या वर्षी विचारांची करू व विचारा विचारात बाबासाहेबांना मानवंदना देऊ .

माझ्या प्रत्येक देशवासीयांना व भीमसैनिकांना येवढच सांगण आहे की हे जे संकट आज आपल्या देशावर आल आहे त्या वर आपण मात करू व पुढचे आदेश येई पर्यंत घरातच राहून आपण आपले सौरक्षण करु . आपल्या भारतासाठी भीम जयंती या वर्षी जरी नाही झाली किंवा घरातच या महापुरुषाला मानवदना दिली तरी काही हरकत नाही , जर तुम्ही खरो खर भीमसैनिक किंवा भीम अनुयायी असाल तर या वर्षी जरी भीम जयंती नाही झाली तरी काय फरक पडला नाही पाहीजे कारण डॉ . बाबासाहेबांचेच वाक्य आहे की
” आपण प्रथम ता भारतीय व अंतथा ही भारतीय ” हे जर का वाक्य सर्व भारतीयांनी व भीमसैनिकांनी लक्षात घेतले पाहीजे . भीम जयंती जरी भीमसैनिकांना करायची असेन तर बाबासाहेबांच्या विचारांची करा कारण या वर्षी ची बाबासाहेबांची जयंती प्रत्येक भारतीयांना लक्षात राहील व खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना एक नवीन आंबेडकर अनुयायी व भीमसैनिक बघायला भेटेल .

      🙏  जय भीम 🙏 

                                                                         
                       - लेखन                                                              
                        खुद्दरंग

कोरोना Go Na

हा लेख नुसता लेख नसून एक सांगण्याचा उद्देश आहे की अता जी परीस्थिती सर्व भारतीयांवर उद्भली आहे त्या वर आपण कसे मात करू शकतो व आपले सौंरक्षण आपणच करू शकतो .

आता हा एक नवीन रोग सर्व भारतीयांना लागू नये म्हणून सरकारने सर्वत्र Lock Down लागू केले आहे तरी सुद्धा काही लोक या नियमाचे पालन न करता घराच्या बाहेर फिराय लागले आहेत .

भारतात हा रोग जास्त पसरु नये म्हणून सरकारनेच किती लक्ष द्यावे , आपले ही कर्तव्य आहे की आपण सुद्धा आपले रक्षण केले पाहिजे आणि आपल्या सरकारचे ऐकले पाहिजे . पोलिस अधिकारी ही गोष्ट सुद्धा सांगून थकले की घरा बाहेर जास्त पडू नका , जर गरज असेल तरच जावा आणि गर्दी जास्त करू नका पण आपण कधी कोणाचे ऐकतो आपण तरी सुद्धा गरज नसताना ही घरा बाहेर पडतो , गरज नसताना सुद्धा गर्दी करतो . तर का बरे आपले पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी संतापणार नाही . जर का आपण त्यांना सहकार्य केल नाही तर आपणच किती संकटात पडू शकतो ही गोष्ट का आजून भारतीयांना समजत नाही .

          

२१ दिवस lock down दिलाय ना मग आपण जरा धीर धरु व हे संकट दूर करू . सरकार , पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना सहकार्य करू आणि या कोरोना वायरस शी मात करू . प्रत्येक वैदकीय कामगारांना , डॉक्टराना व नर्स ला त्यांच्या कामात आणखी यश येऊ हिच इश्वर चरणी प्रथना करू व भारतातून हा विषाणू लवकरच जाऊदे हिच अपेक्षा करू .

आपण घरी बसूनच का होईना
सुरक्षितता पाळूया ना
Social Distance ठेउया ना
Be Safe and Be Carefull ही
गोष्ट ऐकून घेऊया ना
Please Be Serious For Corona

                                    
                   Written By               
                   Khuddrang

” ती ” च स्त्री आहे !

                      " ती " च स्त्री आहे !

प्रत्येकाच्या आयुष्यात एक ” ती ” असतीच
अशाच ” ती ” वर हा लेख समर्पित आहे . एकदा हा लेख वाचून बघा मग तुमचा स्त्रीला पाहण्याचा दुष्टीकोन बदलेल .

” ती ” कोण आहे ? , ” ती ” काय आहे ? .
अशे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असेनच .
पण म्हणतात ना प्रश्न पडले की उत्तर सापडतेच म्हणून अता प्रत्येकाने स्वताच्या मनात झाकू व या प्रश्नाचे उत्तर शोधू की
” ती ” कोण आहे व ” ती ” काय आहे .
अता तर एवढे ती ती केल आहे तर कोण आहे ही ” ती ” याच उत्तर लगेच सांगतोच तुम्हाला .
” ती ” ती म्हणजे एक स्त्री
” ती ” ती म्हणजे एक आई
” ती ” ती म्हणजे एक बहिण
” ती ” ती म्हणजे एक सासू

अशा कितेक ” ती ” प्रत्येकाच्या आयुष्यात असतात . अशा ” ती ” बद्दल मनात आदर आणि गर्व ठेवला पाहिजे . अशी ही ” ती ” आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यात आहे म्हणून आयुष्य सुखी आहे . आपण ” ती ” च्यामुळे आहोत व ” ती ” च आपल्याला आयुष्यभर संभाळते . अशी ही ” ती ” च स्त्री असते .

या लेखात ” ती ” म्हणजे स्त्री असे आहे आणि स्त्री आपल्या आयुष्यात कोणती ” ती ” बनते हे या लेखातून स्पष्ट होते . आयुष्यभर ती च स्त्री आपल्यासाठी काय नाय ते करते आणि त्याच स्त्रीला आपण नेहमी कमी समजत असतो हे पुरुषांना सोबत नाही . आपण पुरुष हे कसे विसरतो कि स्त्री आपल्या आयुष्यातच नसती तर आपल आयुष्य एवढ सुखमय असत का .

आजच्या या युगात स्त्रीयांची सुरक्षितता खुप कमी आहे , आपल्या पुरुषांचे कर्तव्य आहे की आपण स्त्रीयांचे रक्षण केले पाहिजे ना की आपणच त्यांचे भक्षक झालो पाहिजे .
प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे .
प्रत्येक ” ती ” ला मानाचा मुजरा .
प्रत्येक ” ती ” ला ” ती ” च्याच ” त्या ” कडुन मना पासुन धन्यवाद .

” ती ” च स्त्री आहे ! हा लेख अशा प्रत्येक
” ती ” ला आहे जी आपल्या आयुष्याला नवीन आकार देते , आपल्या आयुष्याचा एवढा महत्वाचा भाग बनते की आपल्याला ” ती ” च्या मुळे आयुष्य व्यर्थ वाटते . आयुष्यात
” ती ” च स्त्री नाही तर आयुष्य काहीच नाही .
म्हणुन प्रत्येक स्त्रीला तीचा मान सन्मान दिला पाहिजे . स्त्रीला फक्त स्त्री दिनीच नव्हे तर प्रत्येक दिवशी स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे .
समाप्त

HAPPY WOMEN’S DAY

                                                                  
               -  Written By
                  Khuddrang                                                          

आठवण


               

हा एक छोटासा लेख मी अशा व्यक्तींना संबोधित करतो
जे कोणती ना कोणती आठवण घेऊन जगत असतात.

प्रत्येकाच्या जीवनात अशा काही घटना घडतात की जे ते
आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि त्याच घटना चा समुह
म्हणजे “आठवण”.

आठवण ही अशी गोष्ट आहे की जी सतत आपल्याला
आपल्या प्रेमळ व्यक्तीची आठवण करून देते.

आठवण सतत झालेल्या गोष्टींना वाव देते व त्या गोष्टींचा पुन्हा विचार करायला भाग पाडते.

आठवण माणसाला जगण्याचा नवीन मार्ग सुचविते.

आठवण माणसाला हसवते, रडवते आणि जगण्याचा अर्थ समजवते.

आठवण माणसांच्या भावनांना मजबूत करते.

आठवण माणसाच्या चूकांची जाणीव करुन देते.

आठवण आपल्या प्रेमळ व्यक्तींशी दूर गेल्यावरच तर येते.

आठवण आयुष्यातील प्रत्येक घटनांची आठवण करून देते.

आठवण प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या आठवणीत पाडतेच.

      प्रेमात आठवण व आठवणीच प्रेम
            खुप आठवते

अशी ही छोटीशी आठवण , आठवणीच्या आठवणीत राहीलच
असा हा आठवणीचा लेख आठवणीने “आठवण” या विषयावर तुम्हाला नक्कीच आवडेन……

              समाप्त

                        Written By
                     Khuddrang .